Posts

सामजिक उपक्रमा अंतर्गत नागरिकांच्या व परिसराच्या सुरक्षेकरिता सी सी टी व्ही कैमेरे लोकार्पण सोहळा सहाय्यक पोलिस आयुक्त मा. बाजीराव मोहिते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला

Image
जय महाराष्ट्र !  🚩 👏 माझ्या प्रभाग क्र. १७ (रास्ता पेठ-रविवार पेठ) येथील गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त सामजिक उपक्रमा अंतर्गत नागरिकांच्या व परिसराच्या सुरक्षेकरिता सी सी टी व्ही कैमेरे लोकार्पण सोहळा सहाय्यक पोलिस आयुक्त मा. बाजीराव मोहिते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मा. नगरसेवक विरेंद्रजी किराड, प्रभाग प्रमुख मा. रविंद्र निंबाळकर, शाखाप्रमुख योगेश खेंगरे तसेच शिवसैनिक व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. एकच ध्यास प्रभागाचा विकास !
Image
जय महाराष्ट्र ! हिंदुस्थानातील तेजस्वी महापुरूष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आणि लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस त्रिवार अभिवादन! आज या दोन्ही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानिमित्त शिवसेना पुणे मनपा गटनेते मा. संजयजी भोसले, मा. कसबा विभागप्रमुख विजयजी ठकार, नगरसेविका मा. पल्ल्वीताई जावळे, सागर भोसले, हर्षद ठकार, योगेश येनपुरे, अनिल ठोंबरे, संतोष देवकुळे व शिवसैनिक उपस्थित होते. .
Image
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती दिना निमित्त   विनम्र अभिवादन
Image
जय महाराष्ट्र  🚩 👏 'पुणे मनपा २४ तास पाणी पुरवठा योजनेची अजब पारदर्शकता' २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी २२६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारून पुणे महापालिकेला कर्ज बाजारी करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने पुणे जिल्हा संपर्क प्रमुख मा.आमदार श्री. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत व पुणे मनपा शिवसेना गटनेते मा. संजयजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि. ७ जून रोजी पुणे मनपा आवारात भिक मांगो आंदोलन करण्यात आले होते. सभागृहात सदर ठराव भाजपने बहुमताच्या जोरावर पारित केला होता.  त्यावेळी चर्चे दरम्यान सर्वपक्षीय सदस्यांनी अत्यंत मौलिक सूचना केल्या होत्या ज्यामधे ठेकेदार निकष, निविदा प्रक्रिया, कामाची गुणवत्ता अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. या कामात जेव्हा निविदा प्रक्रिया राबवली गेली तेव्हा मा. अरविंद शिंदे यांनी संपूर्ण निविदा प्रक्रियाच चुकीची तसेच त्यामधे बनाव असल्याची व कोणते ठेकेदार काय दराने काम करणार याबाबत सखोल माहिती सभागृहात निविदा उघडण्याच्या आधीच दिली होती. जेव्हा निविदा उघडल्या गेल्या तेव्हा घडलेही अगदी तसेच ! कर्जरोखी उभारून उभा केलेला निधी जर अशा पद्धत
Image
# लोकशाहीर_आण्णा_भाऊ_साठे   यांच्या जयंती निमित्त   विनम्र अभिवादन.......!
Image
जय महाराष्ट्र !  🚩 👏 आज माझ्या प्रभाग क्र. १७ (रास्ता पेठ-रविवार पेठ) भागातील बुधावार पेठ व रविवार पेठ भागातील कचरा समस्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील मनपा सहाय्यक आयुक्त मा. सुनील गायकवाड यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष जागेवर समजावून घेत त्या संदर्भात काही सूचना केल्या आहेत. सदर कचरा २ दिवसात साफ़ होण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. अन्यथा याविरोधात शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांना सांगितले आहे. नागरिकांनी अशा कचरा संदर्भात काही तक्रारी असतील तर जरुर माझ्या नाना पेठ  येथील संपर्क कार्यालयात संपर्क साधावा. त्याची त्वरित दखल घेतली जाईल. कार्यालय संपर्क :- 02032408171 आपला विनम्र, विशाल धनवडे  🚩 (शिवसेना उपशहर प्रमुख, नगरसेवक, क्रीडा समिती सदस्य)
Image