जय महाराष्ट्र
🚩
👏


'पुणे मनपा २४ तास पाणी पुरवठा योजनेची अजब पारदर्शकता'
२४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी २२६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारून पुणे महापालिकेला कर्ज बाजारी करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने पुणे जिल्हा संपर्क प्रमुख मा.आमदार श्री. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत व पुणे मनपा शिवसेना गटनेते मा. संजयजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि. ७ जून रोजी पुणे मनपा आवारात भिक मांगो आंदोलन करण्यात आले होते. सभागृहात सदर ठराव भाजपने बहुमताच्या जोरावर पारित केला होता. त्यावेळी चर्चे दरम्यान सर्वपक्षीय सदस्यांनी अत्यंत मौलिक सूचना केल्या होत्या ज्यामधे ठेकेदार निकष, निविदा प्रक्रिया, कामाची गुणवत्ता अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. या कामात जेव्हा निविदा प्रक्रिया राबवली गेली तेव्हा मा. अरविंद शिंदे यांनी संपूर्ण निविदा प्रक्रियाच चुकीची तसेच त्यामधे बनाव असल्याची व कोणते ठेकेदार काय दराने काम करणार याबाबत सखोल माहिती सभागृहात निविदा उघडण्याच्या आधीच दिली होती. जेव्हा निविदा उघडल्या गेल्या तेव्हा घडलेही अगदी तसेच ! कर्जरोखी उभारून उभा केलेला निधी जर अशा पद्धतीने वाया गेला तर ना सत्ताधारी पक्ष जबाबदारी घेण्याची मानसिकता ठेवेल ना प्रशासन ! मग याला जबाबदार कोण यावर चर्चा सुरु होईल व नेहमी प्रमाणे जबाबदारी एकमेकांच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न सुरु होणार यात यत्किंचितही शंका नाही. या योजनेतील भ्रष्टाचाराबाबत सीबीआयकड़े तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. त्यावर सीबीआयने पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार यांना संबंधित प्रकरणाची चौकशी करावी असे पत्र पाठवले होते. पण ते पत्र प्रशासनाने लपवून ठेवले व सभागृहात त्याची जरादेखील कल्पना दिली नाही. पुणे मनपा प्रशासनाने असे कृत्य करत पुणेकर नागरिकांची एक प्रकारे घोर फसवणुक केली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिवाय आता जीएसटी लागू झाल्याने करात कपात झाल्याने सुमारे १८० कोटी रु. वाचणार आहेत हे स्पष्ट होत आहे. आता प्रकरण अंगाशी आल्यावर मुख्य लेखपाल व दक्षता विभागाने सदर निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतले आहेत. सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर जो ठराव संमत करून घेतला पण त्या ठरावाच्या संबंधित निविदा घोटाळयावर मात्र मौन बाळगले आहे. हा संपूर्ण प्रकार म्हणजे पुणेकर नागरिकांच्या करातुन पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झालेल्या रकमेवर डल्ला मारल्या सारखेच आहे. आता सत्ताधारी भाजप पक्ष व प्रशासन या संपूर्ण प्रकरणावर काय 'पारदर्शक' कारभार करत निर्णय घेते याकडे पुणेकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
खालील लिंक मधे सर्व माहिती आहे...
http://zeenews.india.com/…/500-crore-scam-in-pune-mu…/374965
http://zeenews.india.com/…/500-crore-scam-in-pune-mu…/374965
पुणेकरांच्या तोंडी मात्र आता एकच आहे....शुभं भवतु !
आपला विनम्र,
विशाल धनवडे
🚩
(उपशहर प्रमुख, नगरसेवक, क्रीडा समिती सदस्य पुणे मनपा)
विशाल धनवडे

(उपशहर प्रमुख, नगरसेवक, क्रीडा समिती सदस्य पुणे मनपा)

Comments
Post a Comment