।। जय हरी विट्ठल ।।
सालाबादप्रमाणे रविवार दि. १८ जून रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली व जगतगुरू श्री तुकोबाराय यांच्या पालखींचे अनुक्रमे पालखी विठोबा मंदीर, भवानी पेठ व निवडुंगा विठोबा मंदीर, नाना पेठ येथे आगमन होणार आहे. त्यानिमित्त पालखींचे स्वागत, सर्व वारकरी विट्ठलभक्त माय-माऊलींची निवासी सेवा, पालखी मुक्काम, दर्शन सेवा, सभामंडप इ. कामाचे नियोजन करण्याकरिता पुणे शहराच्या मा. महापौर सौ. मुक्ता टिळक यांच्या बरोबर विट्ठल मंदिरात चर्चा झाली. त्यानिमित्त पुणे महानगरपालिकेतील माझे सहकारी नगरसेवक/ नगरसेविका मा. श्री. अजय खेडेकर, मा. श्री. वनराज आंदेकर, मा. सौ. लक्ष्मी आंदेकर, मा. सौ. सुलोचना कोंढरे व पालखी विठोबा मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष मा. तेजेंद्र कोंढरे उपस्थित होते....


Comments
Post a Comment