जय महाराष्ट्र !
🚩
👏
शिक्षण क्षेत्रातील अशा निराशाजनक कामगिरीवर व दयनीय परिस्थितीवर युवासेनाप्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांनी कायमच आवाज उठवला आहे. यावर लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे अन्यथा शिवसेना आपल्या भुमिकेवर ठाम आहे. लवकरच पुणे विद्यापीठातील कारभार व विद्यार्थ्यांच्या समस्यांबद्दल पुणे शहर युवासेना व शिवसेना पक्षातर्फे आढावा बैठक घेण्याचे नियोजन आहे. प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यांच्या समस्या, शालेय पोषण आहाराचा दर्जा व ठेकेदार निकष, विद्यार्थी वाहतुक सेवा, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, सोयी-सुविधा, वसतिगृह समस्या, शाळा व महाविद्यालयीन क्रीडा क्षेत्रातील गैरकारभार, गुणवत्ता निकष दुर्लक्ष, विद्यार्थिनींची सुरक्षितता, शिक्षकांच्या समस्या, शिक्षकांच्या वेतन समस्या, उपहारगृह अवस्था, खाजगी क्लासेसची मनमानी अशा अनेक प्रश्नांवर पुणे शहर युवासेना संबंधित शिक्षण संस्था, महाविद्यालये, विद्यार्थी संघटना यांच्याशी संवाद साधुन त्यातील अनियमितता व गलथानपणा दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. पुणे शहरामधील शिक्षण क्षेत्रातील जास्तीत जास्त समस्या लवकरात लवकर मार्गी लावून प्रलंबित प्रश्नांबाबत पुणे महानगरपालिका व तसेच गरज पडली तर विधान भवनात शिवसेना लोकप्रतिनिधींच्या मार्फत आवाज उठवला जाईल याची खात्री देतो.
शिवसेना...सदैव कार्यतत्पर !



Comments
Post a Comment